29 C
Mumbai
Tuesday, October 19, 2021
Homeठाणेवर्तकनगर पोलीस स्टेशनचे हद्दीतील सार्वजनिक शौचालयाचे समोर एक तरुण यांना धारदार हत्याराने...

वर्तकनगर पोलीस स्टेशनचे हद्दीतील सार्वजनिक शौचालयाचे समोर एक तरुण यांना धारदार हत्याराने वार करुन जीवे ठार मारले। —- रिपोर्ट – बीनू वर्गिस

ठाणे – वर्तकनगर पोलीस स्टेशनचे हद्दीतील भिमनगर समिश्र वस्तीमध्ये दिनांक 09,/09,/2018
रोजी रात्री 00:30 ते दिनांक 10/09/2018 रोजी पहाटे 04:00 वा. सु. पाईप लाईन लगत असलेल्या सार्वजनिक शौचालयाचे समोर अनिल उर्फ मास दामोदर गाडेकर वय 27 वर्षे रा. भिमनगर,वर्तगनगर ठाणे यांचा कोणीतरी अज्ञात इसमांने अज्ञात कारणांवरुन गळयावर धारदार
हत्याराने वार करुन जीवे ठार मारले बाबत मयताची बहिण सौ.मनिषा किशोर वाघमारे वय 20 वर्षे
हिने दिलेल्या तकारी वरुन वर्तकनगर पो.स्टे. गुन्हा नोंद कंमाक 1 216,//18 कलम 302 भादवि
प्रमाणे अज्ञात इसमांविरुध्द दिनांक 10,/09,/2018 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

मा.पोउपआ.परिमंडळ 5 वा.ई.ठाणे, श्री. अंबुरे, मा.सहापोआ.वर्तकनगर विभाग ठाणे श्री. भोर
यांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासीक अंमलदार व.पो.निरी.श्री.प्रदिप गिरीधर, यानी अज्ञात
आरोपीचा याचा शोध होणेसाठी 03 पथक तयार केले.

आरोपीचे शोधासाठी घटनास्थळाचे आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज, मयताचे मोबाईलचे सीडीआर, सदर भागातील 15,/20 संशयिताची पडताळणी केली. परंतु आरोपी बाबत काही एक
माहिती मिळून येत नव्हती. गुन्ह्याचे तपासा दरम्यान स्थानिक लोकांशी समन्वय साधला असता
त्याचेकडुन माहिती मिळाली की, दिनांक 09,/09,/2018 रोजी रात्री सनी उर्फ गब-या मोरे याचे 02 मुंला बरोबर भांडण झाले होते. त्यावेळी त्याने त्याना धमकवणेसाठी चाकु काढला होता.
सदरचा गुन्हा घडले पासुन सनी उर्फ गब-या मोरे हा सदर भागात दिसुन येत नाही. अशी
माहिती मिळाली.

आरोपीत सनी उर्फ गब-या रमेश मोरे, याचेकडे लक्ष केंद्रीत करुन त्याचे ठाठिकाणाची
माहिती घेत असताना सनी उर्फ गब-या मोरे हा दिनांक 13,/09,/2018 रोजी रात्री 21: 30 वा.
हाजुरी पाईपलाईन येथे पगाराचे पैसे घेण्यास येणार असल्याचे बातमी मिळाली. बातमीचे अनुषंगाने
हाजुरी पाईपलाईन येथे मा.पोउपआ.परि.5 वाइ. याचे मार्गदर्शनाखाली व.पो.निरी श्री.प्रदिप
गिरीधर,सहापोनिरी,/ गायकवाड, पोउपनिरी,/हट्टेकर, पो.हवा. 1213 यादव, पो.हवा. 6244
भोसले,पो.ना. 5027 शेजवळ,पो.ना. 1472 गावडे,पो.ना. 1603 पाटील, पो.शि.6649 सावंत,पो.शि.7039 तडवी, यानी सापळा रचुन आरोपी सनी उर्फ गब-या मोरे वय 20 वर्षे यांस कोणत्याही प्रकारे पळुन जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशी केली असता समजले की, दिनांक 09,/09,/2018 रोजी रात्री अनिल उर्फ मास गाडेकर हा भेटला. त्याचे बरोबर गप्पा मारत असताना भांडण झाले.त्यावेळी अनिल उर्फ मास याने शिवीगाळ केल्याने त्याचा राग मनात धरुन स्वतः जवळील चाकूने अनिल उर्फ मास याचे गळयावर वार करुन त्यास जीवे ठार
मारल्याची कबुली दिली. अशा पध्दतीने आरोपी बाबत काहीएक सुगावा नसताना दिवस रात्र
कठोर परिश्रम घेवून आरोपी यास अटक करुन सदरचा गुन्हा उघउकीस आणला आहे.

https://manvadhikarabhivyakti.files.wordpress.com/2018/06/img_20180529_134443.jpg

सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास मा.पोलीस उप आयुक्त सो, परि-5 वागळे इस्टेट
ठाणे, मा. सहा.पोलीस आयुक्त सो, वर्तकनगर विभाग, ठाणे यांचे मार्गदर्शनानुसार व.पो.निरी. श्री.
प्रदिप गिरीधर नेमणुक वर्तकनगर पो.स्टे. हे करीत आहेत.

https://manvadhikarabhivyakti.files.wordpress.com/2018/05/img_20180528_164636.jpg

Contact Now

09004761777, 07977643978, 08850736386

OR E-mail – rohinee.enterprises@gmail.com

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments