28 C
Mumbai
Wednesday, October 20, 2021
Homeमहाराष्ट्रभीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई ! ----- धीरज परब

भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई ! —– धीरज परब

कोरेगाव भिमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती.[२] ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टाँटन करीत होता तर पेशवाईंच्या मराठा साम्राज्याच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे ५०० महार सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. पेशव्यांच्या सैनिकांत बहुतांश मराठा सैन्य होते, तसेच अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता.या युद्धात पराभूत झालेल्या मराठा साम्राज्याचा अस्त झाला.

कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहिद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’.

महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (पूर्वाश्रमीचे महार), दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमुर्ती व डॉ. आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहिद सैनिकांच्या विजयस्तंभाला मानवंदना दिली जाते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments